कूठेतरी दूर डोंगरावर पाउस पडला असेल. मला त्या पावसाचा सुगंध स्वतःमध्ये सामावून घ्यावा वाटला..! ही तर साधी सुरवात आहे, पाउस आणि पावसाची श्रृंखला आणखी बरीच दूर आहे.
पण हा असा दूरून आलेला सुगंध का जाणे मनाला भूरळ लावतो..!
जीव पुरता गुंतवतो..!
हवीहवी वाटणारी तुझी-माझी भेट मनात रंगवतो..! आणि प्रत्येकदा हा सुगंध नवीन जखम उलगडतो..
दिवस बदलत जातात, आपण बदलत जातो, आपले विचार बदलत जातात, नियतीचा खेळही बदलत जातो. हा खेळ खेळायचा आपण टाळता म्हणता टाळू शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचाळतो, पडतो, जखम होते, जखमाही होतात. काही ठिक होतात, काही ठिक झाल्या असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात..
आणि ज्या कधीच ठीक होत नाहीत त्यावर आपण
काळ नावाचे औषध शोधतो आणि त्याच्या परीणामाची वाट बघत असतो..
प्रेम अशीच एक जखम आहे, नाही का..?
काळ नावाचे औषध काम करणार हे माहीत असतानाही थोड्या थोड्या वेळानी ही जखम बरी झाली की नाही याची खात्री केली जाते..
प्रेम म्हणजे जखम आहे..!
हवीहवी वाटणारी..!
तीचे वळही हसत हसत ह्रृदयावर घेतले जातात अशी सुगंधी जखम- प्रेम..!