"तुला कसं कळाल तू त्याच्या प्रेमात पडलीस ते..??" प्रिया साराला कुतूहलाने विचारत होती, "तुला काय वेगळ जाणवलं, जेव्हा तुला कळाले कि तुला तो आवडतो..?? तू त्याच्यावर प्रेम करते..?" प्रियाचे प्रश्न शांततेनी ऐकण्याशिवाय सारा दुसरे काही करूही शकत नव्हती..!!
“शांत हो आधी..!! तुझ्या या प्रश्नांची नेमकी काय उत्तरे तुला अपेक्षित आहे, हे मला समजत नाही आहे..!!”, सारा.
“अग..!! म्हणजे, तुझ्या स्वप्नात वैगेरे येतो तो..?? कि, सर्वीकडे तुला तोच दिसतो..?? कि, तू फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करते..?? कि, तू त्याच्या फोन ची डोळे लावून वाट बघते..?? कि, त्याला भेटण्यासाठी कारणे शोधते..?? कि, तुला सर्वीकडे तो फक्त तोच हवा असतो..??” प्रिया नि प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. “सांग ना नेमके काय वाटले आणि तू ठरवलस कि तू प्रेमात पडली. कुणाच्याही एकदम प्रेमात पडण्यासारखी तू नाहीस ना..!! म्हणून विचारतेय मी..!!”, आता प्रियाचा सूर लडिवाळ पणाचा झाला होता..!!
“हे जे तू सर्व सांगितलं ते झालं किंवा होत असेल तरच प्रेमात पडलोय असा अर्थ होतो का..??” सारानी प्रतिप्रश्न केला..
“म्हणजे..??”, प्रिया पुरती गोंधळली..!!
“म्हणजे, तू जे म्हणाली ना स्वप्नात येतो वैगेरे, तेच जर प्रेम असेल तर प्रेमात पडली नाहीये मी..!! आणि प्रेमात पडल्यावर ही जी तू काही सोंगे सांगितली ती मागे लागणार असतील तर अश्या प्रेमात पडायचेही नाहीये मला..!!”, आणि सारा एकदम शांत झाली..!!
“मग तू कशावरून ठरवलस तू प्रेमात आहे ते..??”, प्रिया.
“मला त्यानी स्वातंत्र्य दिलं, आणि प्रेम म्हणजे ही स्वातंत्र्यच..!! आणि तू जे सांगितलं ते तर सरसकट त्याच्या कैद्यासारखेच वागायचे..!! मला वाटते प्रेम असं फक्त त्याच्यात बांधून ठेवणार नसावं..!! प्रेम म्हणजे माझी मी असण्याच स्वातंत्र्य आणि त्याला तो असण्याच स्वातंत्र्य..!! माझ्यावर त्याची बंधने नाहीत, आणि त्याच्यावर माझीही नाहीत..!! मला त्याची तक्रार नाही, त्याला माझी नाही..!! अगदीच टोकाचे सांगायचे झाले तर प्रेम म्हणजे त्याला त्याचा संसार उभारण्याची मुधा आणि मलाही माझ्या संसाराचे स्वातंत्र्य..!!
फक्त तो, त्याची स्वप्ने, त्याची वाट पहाणे, त्याचे विचार ह्याला प्रेम नाही ‘त्याची बाधा’ म्हणावी लागेल..!!” स्वत: ला समजलेला प्रेमाचा थोडाफार अर्थ सारा शब्दांची जुळवाजुळव करून सांगायचा प्रयत्न करत होती..!!
“तुला हे असं, तू सांगितलेलं प्रेम करणारा भेटला..?? त्याला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही..?? आणि तुलाही पण..??”, प्रिया.
“हो, भेटला..!! मी त्याच्यावर प्रेम करते, या पेक्षा कुठली अपेक्षा त्यानी ठेवावी..?? आणि तो मला त्याच्यावर प्रेम करू देतो, सांग मग आता मी आणखी कुठली अपेक्षा त्याकडून ठेवावी..??”, सारा..!!
“सहीच”, प्रिया. “तोही तुझ्या वर प्रेम करतो..??”
“या प्रश्नाचे उत्तर मी कशी देणार..?? आणि हा प्रश्न मी त्याला विचारूही कसा..?? प्रेम म्हणजे स्वातंत्र्य..!! या प्रश्नांनी प्रेमाचा अर्थ बदलेल, आणि ते मला चुकूनही नकोय..!!”, सारा.
“म्हणजे नाही असं उत्तर आहे का..??”, प्रिया.
“”नाही असं नाही, फक्त या प्रश्नाच्या उत्तराची गरज नसनेच म्हणजे प्रेम..” सारा..!!
No comments:
Post a Comment