Monday, 7 April 2014

प्रेम व्यक्त करताना ७


“पस्तावतोय का मी आज,किती राग उफाळत होता तेव्हा मनात,रागाच्या भरात कोवळ्या वयापासून जाणत्या वया पर्यंतच्या सर्व आठवणी अश्या कश्या फेकून आलो?”
आज १०-१२ वर्षानंतर सर्व settle झाल्यावर एकदमच जुनी आठवण का आठवली म्हणून सागर चकित झाला..

पुढल्या महिन्यात वयाची तिसी पूर्ण करणार होता,घरी लग्नाची बोलणी सुरु झाली होती आणि कितीतरी चांगली मुलींची स्थळे यायला लागली होती,म्हणूनच असेल कदाचित त्याला नेहा आठवली.. आणि का आठवू नये..? प्रत्येक वेळेस जेव्हा त्याला कुणाचीही गरज असो-ती नेहमीच तयार असायची. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते,पण दाखवायचे मात्र नाही. पण एक दिवस नेहाला ह्या भावना जड झाल्यात आणि ती सर्व बोलून गेली.. तेव्हा तो तिला नाही म्हणाला.. का “नाही”..! याचे उत्तर आजतागायत त्यालाही मिळाले नाही, पण तिच्या propose नंतर तो रागा-रागात खूप भांडला तिच्याशी.. स्वत:च्या भावना हिला बोलता आल्यात मला का नाही हाच राग उफाळत असावा कदाचित.. दोघांच्या मनात प्रेम असूनही खूप भांडले, त्या नंतर तीन वर्ष ते दोघेही बोलले नाही.. नंतर क्वचित बोलायचे..

आज इतक्या वर्षा नंतर त्याला त्याच्या “नाही” ची आठवण झाली.. स्वत:च्या तेव्हाच्या रागाचा तिरस्कार वाटला.. तिची आठवण आणखीच तीव्र झाली, म्हणून तिला phone लावला..

“उचलेल का ती..??”, पहिली बेल वाजताच..

“का नाही उचलणार..!!”, ती नी call उचलताच सर्व ऐकून reply केला.. “अगदी योग्य वेळी call केलास मी तुलाच call करण्यासाठी Mobile शोधत होती..”

“अरे बापरे माझी आठवण कशी झाली आज..?”,सागर खूप जास्त surprised होऊन म्हणाला..

“माझा साखरपुडा आहे आज सायंकाळी, घरीच छोट function आहे.. आणि नेमका तू गावात आला आहेस हे समजले, म्हणून तुला बोलावण्यासाठी call करत होती.!!”

मला call करायला उशीर झाला हे मनोमनी जाणत तो, “मस्त... गुड news आहे ही तर.. ठीक आहे संध्याकाळी बोलूयात मग, पण एक सांग तू खुश आहे..?”

ती, “का नसावी..?? खूप खुश आहे..”

तो, “चांगल आहे..!! भेटू..”


खोटही धड बोलता येत नाही हिला का विचार करत त्यांनी phone ठेवला..

No comments:

Post a Comment