Tuesday, 1 April 2014

प्रेम व्यक्त करताना ३

“भेटशील एकदा..??”, भीत-भीत तीने, त्याला रोहनला SMS पाठवला.

तो नाही म्हणाला तर आणि भेटायला झालाच तयार तर, काय काय बोलू.? सुरवात कशी करू.? कसा आहेस विचारू, कि जाऊन सरळ आलिंगन देऊ..! अशे आणि अनेक विचार करत ती त्याच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होती..!!

त्याला भेटण्यासाठी डोक्यानी कधी परवानगी दिली नाही, हे तर मन इतक वेड असतं. कितीदाही दटावलं तरी स्वत:चा हट्ट सोडत नाही, अशी स्वत:ची समजूत ती स्वत:च काढत होती.
****************
एक तास उलटला पण त्याचा काही Reply नाही, म्हणून तिनी नेट वरून आपली परतीची आजची तिकीट confirm केली. आज ती स्वप्नातून सत्यात जाणार होती..!! तीन वर्षानंतर स्वत:च्या घरी परतणार होती..!! १५-१६ तासाच्या अंतरावर तिची स्वत:ची माणसे डोळे लावून तिची वाट पाहत होती..!! फक्त जायच्या आधी एकदा त्याला डोळे भरून पाहायचे होते, सत्यात उतरायच्या आधी स्वप्न जगायचे होते. पण त्याचे काही उत्तर नाही म्हणजे त्याने भेटायचे नाकारले असा समज करत ती स्वत:च्या Packing ला लागली.

बिप..!!
आणि Mobile वाजला, त्याचाच SMS असेल म्हणून तिनी उत्साहाने वाचायला हातात घेतला..

“कशाला भेटायचे..?? असू देत ना..!! तसही भेटल्यावर बोलतो कुठे आपण..??”, त्याचे नकारात्मक उत्तर पुन्हा..!!

प्रत्येक गोष्टीला नकारच द्यायचा हा काय ठेका घेतलाय का ह्यांनी असा उगाचच एक विचार तिच्या डोक्यात येऊन गेला..!!

“हम्म, तृप्त मनाने जावे म्हणते घरी..!! अशी अव्यक्तता आणि अतृप्ती इथेच सोडून द्यायची आहे..!!”, खूप भावणूक होऊन तिनी Reply केला..

“कधी जाते आहेस.?” त्याचा एक कोरडा प्रश्न.

“आज रात्री ९ ची बस आहे.” तीही मोजकेच बोलली.

“जमल तर येतो सोडायला, पण तू वाट पाहू नकोस..!!”
त्याचा हा SMS वाचून त्याला काहीही उत्तर न पाठवता ती Packing च्या कामाला लागली..!!

मलाच फार पुळका आला होता भेटायचा. जाता जाता गोष्टी Clear करायचा,शेवटी तरी प्रेम वक्त करायचा..!!
काही गरज नाहीये सोडायला बिडायला यायची,एकटीच आली आणि एकटीच जायला समर्थ आहे मी..!! वाट नको पाहू म्हणे, कधी बघितली मी वाट? नाना प्रकारचा गोंधळ मनात चालू असताना अश्रू गालावर ओघळले आणि दाबून ठेवलेला हुंदका निघालाच..!! Roommate ला वाटले शहर सोडून जाते आहे म्हणून भावणूक झाली असावी..!! पाहणाऱ्याला वाटत वेगळेच होते, दिसत दुसरेच होते आणि चालले काही तिसरेच होते..!! स्वत:च्या रडण्यामागची माणसे आणि कारणे ही तिला इथेच सोडून जायची होते..!!
****************
८:५० ला त्याचा फोन आला,तेव्हा ती नुकतीच बस मध्ये चढली होती..!!
गोंधळलेल्या अवस्थेत Call उचलत ती, “Hello”
तो, “कुठल्या पार्किंग वर आहे तुझी बस..??”
ती, “पहिल्या..!!”
“मी आलो आहे कुठे आहेस तू..?”
जायच्या क्षणी सोडायला आला आहे म्हणून ती गाडीतून खाली उतरून त्याला शोधात म्हणाली, “ दिसलास..!! तुला असं दुरून पाहण्यात एक गंमतच आहे खरी..!! चंद्र दुरूनच छान दिसतो, तू अगदी तसाच आहेस..!!”

“तू आहेस कुठे, हे तरी सांग..? खूप गर्दी आहे इथे..!!”

“त्याच गर्दी मधली एक झाली आहे मी आज..!! ऐक माझे, शोधू नको. तुला शेवटचे पाहायचे होते बघितले..!! जाते आता..!!” आलेला हुंदका कसाबसा दाबत एका श्वासात ती हे बोलून गेली..!!

“तू रडते आहे का..??”

“नाही.. नाही.. बिलकुलच नाही.. माझी बस निघते आहे.. भेटलोच कुठे तर ओळख दाखव..!! Bye..!!”

तो काय म्हणतो हे ऐकण्याचाही आधी तिनी call कट केला..!! अश्रू पुसले, खिन्न हसली आणि बस मध्ये चढली..!!

जाता जाता त्याच्यासाठीच्या भावना बोलू शकली नाही म्हणून, कोंडलेले मन आणि प्रेम व्यक्त केले असते तर..?? हा प्रश्न उराशी बाळगून तिने Music Player मध्ये गाणे लावले, ‘हे भलते अवघड असते..कुणी प्रचंड आवडणारे..... अशे दूर दूर जाताना....’

“रडत नाही म्हणे,खोट ही थड बोलता येत नाही हिला..!!”,हे त्याच्या समोरून जाणाऱ्या बस कडे पाहत तो म्हणाला..!!

No comments:

Post a Comment