“तब्बल दोन वर्षानंतर भेटतो आहोत नाही आपण..??”, त्याची हाक ऐकल्यावर ती पहिले हेच म्हणाली.
“हो ना दोन वर्ष झालेत पण, किती लवकर सरकतो हा वेळ..!! नाही..??”, त्याच्या या वाक्याला उत्तर देताना ती जरा थबकली.
“लवकर सरकतो..?? मला तर दोन युगे सरल्यासारखी वाटली..!! मी काही फार रिकामी वैगेरे नाही आहे, तुझी वाट पाहण्या इतपत, पण तुझ्या बद्दल ऐकल्याशिवाय दिवस सरल्यासारखा वाटायचाच नाही..!! आणि तुझ्यातच इतकी बांधली गेली कि तुला स्वत: होऊन तुझ्याचबद्दल विचारायचे कधी धाडस केले नाही..!!”, हे विचार मनातच दाबून ती फक्त म्हणाली, “ते तरी बरे झाले भेटलो दोन वर्षांनी, नाहीतर काय चाललंय तुझ्या आयुष्यात हे कळायला मार्गच नाही..!!”
तो हसून, “इथे जवळच CCD आहे, चल तिथेच बसून थोड्या गप्पा करू..”
“काय सुरु आहे तुझे? लग्न वैगेरे झाले असेल असे वाटले होते मला”, त्याची मस्करी सुरु झाली.
“लग्न..!!” शब्द कानावर येताच दचकून तिनी वर बघितले. कॉफ्फी ची order देतानाही तो तसाच शांत होता, जसा नेहमी असायचा, जसा दोन वर्षापूर्वी तिच्या कॉलेज मध्ये होता, तिच्या क्लास मध्ये होता- तसाच शांत..!! आजही तीचे अव्यक्त प्रेम न समजण्याइतका भोळा तो..!!
आपल्या प्रश्नाला काहीच का उत्तर देत नाही आहे ही,म्हणून तिची तंद्री तोडण्यासाठी तिच्या समोर चुटकी वाजवत तो म्हणाला, “कुठे हरवलीस..??”
“दोन वर्षापूर्वी”, आपण काय बोलतोय हेही विसरल्या सारखी झाल्याने ती बोलून गेली..!!
“अं..?? दोन वर्षापूर्वी..??”, तो जरा अचंब्याने म्हणाला.
विषय कसा बसा हताळत आणि थोडी गोंधळात ती म्हणाली, “अरे हो, बघ ना..!! दोन वर्षापूर्वी किती व्यस्त होतो, आपण..!! जरा बसून बोलायला वेळ नव्हता, तुझ्या मागे धावायला लागायचं, भेट-भेट, बोल-बोल म्हणत..!! आणि आज चक्क तूच म्हणालास गप्पा करू..!! असा इतकासा बदललास..??”
मिस्कील हसून तो म्हणाला, “नाही बदललो वैगेरे नाही, फक्त तुला असं अचानक दोन वर्षानंतर बघितल्यानी छान वाटलं आणि बोलायची इच्छा झाली. शेवटी कॉलेज मध्ये तूच एकटी चांगली मैत्रीण होती माझी..!! आणि तसाही तुझी काही बातमी मिळाली नाही,म्हणून म्हटलं बोलावं तुझ्याशी.. सांग कशी आहेस तू.??”
“मी या क्षणापर्यंत मज्जेत होती. सर्व सुरेख – सुलभ सुरु होते-तुझी हाक येई पर्यंत...!! आज असं तुझ्या दिसण्याने पुन्हा प्रेमात पाडलस सख्या..!! आणि आजही प्रेम व्यक्त करताना मी अडखळते आहे..” हेच अगदी हेच बोलायचं होता तिला पण आलेली ही शब्दाची रांग तशीच दाबत,आणि थोडी नजर चोरत म्हणाली, “ मी काय! मज्जेत अगदी, तूच सांग काय नवीन ते..??”
“तू आजही तशीच आहेस ते वाटते ते न बोलता मनात लपवून, दुसरं काही बोलताना नजर चोरते. किंचितही बदललेली नाहीस..!! आणि माझं काय, नेहमी सारखंच आहे. घरी जायचं टाळतो, नोकरी आणि वाटलं तेव्हा बाहेर फिरायला जातो.. बेजान आहे माझी जिंदगी”
त्याला असं बोलताना पाहताना आज स्वत:च्या भावना मी बोलून देते कि काय, अशी शंकेची पाल स्नेहाच्या मनात चुकचुकली.. आणि नको गेली ५-६ वर्षे जपलेले हे मैत्रीचे नातेही आपण गमावून बसू हा ही उगाचच विचार डोक्यात डोकावला. आणखी काही क्षण इथे बसलो तर अव्यक्त प्रेम प्रेम व्यक्त व्हायला वेळ लागणार नाही हे कळून चुकलं असेल कदाचित म्हणून काहीतरी आठवल्यासारखे करत ती म्हणाली, “ऐक ना, निखील..!! पुन्हा कधी भेटून गप्पा करुयात का आपण? मला काही कामे आठवलीत, चालेल तुला..??”
“किती दिवस धावणार आहे स्वत:च्या भावणे पासून तू..!!”, हे तिच्या सर्व भावना माहित असलेला निखील मनातच बोलला आणि तिला म्हणाला , “चालेल, कुठे सोडायचं आहे तुला..??”
“थांब म्हणाला असतास तर थांबली असती”, हे मनातच घोकत, “ नको, सोडू नकोस..!! जाते मी.. पुन्हा हा वन वे,तुलाच उगाच त्रास..”
“नक्की..??”, तो.
“अरे हो..!! जाते मी, भेटू पुन्हा..!! Bye..”, अशे म्हणून,अव्यक्त भावना उरात तशाच बाळगत,दाटलेला कंठही सांभाळत, गर्दीच्या विरुद्ध ती चालू लागली..!!
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत निखील फक्त हेच म्हणाला, “खोटही धड बोलता येत नाही हिला..!!”
No comments:
Post a Comment