Monday, 7 April 2014

प्रेम व्यक्त करताना ८

“काय..?”,जवळ जवळ ओरडतच त्याने हा प्रश्न आलेल्या call वर विचारला..

“अरे..!! पण कस शक्य आहे हे...!!”

“नाही यार..!! माझ्या विचारा बाहेर जातोय हा विषय आता..”

“अच्छा, थोडक्यात म्हणजे तिच्या आत्महत्येला मी जबाबदार आहे असे म्हणायचे आहे का तुला.?”

“नाही, तू म्हणतोय तेही पटतंय मला, अरे पण तिनी कमीत कमी घरच्यांचा तर विचार करायचा..!!”

“हो प्रेम आंधळ असतं, पण इथे आंधळे पनावरही पट्टी बांधली असं दिसत आहे..”

“माझ्या मुळे तिनी आत्महत्या केली हे ओझ घेऊन जगू का मी.? माझीच अग्निपरीक्षा आहे का ही..??”

“नाही रे call नाही करत, direct भेटायलाच जातो ना.. कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहेस म्हणालास ती..??”

“का काय विचारतोय..?? सोसाईट नोट नाही ना ठेवली तिनी..??सरळ आणि स्पष्ट आहे तिचा जीव गेला असता तर मीच गुन्हेगार असतो..!! कुणाचे नशीब बलवत्तर माझे कि तिचे वाचली बिचारी ती..”

“फक्त एकदा जाऊन काय चुकल ते तरी विचारतो..!!”

“रागात नाही तर मग काय लहान बाळासारखे विचारू..!! बेटा सोनाली, हाताची नस का कापलीस..?? असं काय झाल तुझ्यासोबत..??”

“शांत रहायला सांगूच नको बे तू..!!”

“तिला तिच्या आईचाही विचार करावासा वाटला नसेल का..??”

“हे obvious आहे आता आत्महत्या करायची तिनी, आणि लोकांच्या नजरेत वाईट आम्ही..”

“सोड, बरोबर आहे तुझ..! चेहरा नाही बघणार मी तिचा..”

“ ‘प्रेमभंग’ वैगेरे नाही रे, आमचे विचार पटत नव्हते म्हणून शांतपणे-सामंजस्याने ठरवून केलेला ब्रेंक-अप होता तो, तेव्हाच तिला पटले होतो कि अजून गुंतलो तर भावी आयुष्यात आणखी गुंतू आणि दोघेही बरबाद..!! जर समजूनही आम्ही जबरदस्तीने relation मध्ये राहिलोच असतो तर वाद आणि दुरावेच वाढले असते.. म्हणून हे decision घेतलं यार..!!”

“पण ती आत्महत्या वैगेरे करेल असं नव्हतं वाटल रे..!!”

“परवाच बोललो तेव्हा नॉर्मल बोलली रे ती.. म्हणजे खोट बोलता यायला लागल तर तिला..!!”, आणि त्यांनी Call ठेवला..


No comments:

Post a Comment