बीप..!!
मोबाईल वाजला..!!
वाचत असलेली कादंबरी बाजूला ठेवून तिनी आलेला msg बघितला..!!
“तुझी कालची पोस्ट वाचली, आधीपेक्षा खूप चांगलं लिहायला लागली तू..!! खूप मोठा बदल झाला आहे लिहिण्यात. छान लिहिलंस, आवडली कविता..”
स्नेहा चा msg होता..!! कुणी आपल्या लिहिण्याबद्दल स्तुती केली कि आनंदच होतो, तिलाही झाला..!! “THANK U..!!” तिनी reply केला..!!
“चांगली लिहयला लागली..??” स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारत होती.
“इतका बदल का पण..??” पुन्हा स्वत:लाच प्रश्न..!!
उत्तर तिला माहिती होते, ते उत्तर आपण चांगलं लिहायच कारण असावं हे आवडत नव्हतं..!!
“खरच फक्त त्याच्या मुळे मी चांगली लिहयला लागली..!!” हा विचार डोक्यात आला आणि डोळे बंद करून हा विचार डोक्यातून घालवायचा प्रयत्न केला, पण उलट त्याच्याच विचारांची शृंखला बनत गेली..!!
“काय लिहिलंय हे ‘राधा झाली’,’ रात्र होती’ वैगेरे हे असं काही वाचत नसतो मी” तो एकदा म्हणाला होता..!!
तेव्हा रागात रागात “तुला कुणी वाचायला सांगितलं नको ना वाचू..” म्हणून ती मोकळी झाली.
पण तेव्हा ठरवले होते चांगले लिहायचे त्यानी ‘वा..!! क्या बात है..!!’ म्हटलंच पाहिजे.
नंतर खूप कविता लिहिल्या, प्रत्येकीत ‘तो’ होता..!
एकदा तिने त्याला विचारलेही होते, “वाचतो कि नाही, माझ्या कविता...??” तेव्हा तो म्हणाला होता, “तू काही लिहिणार आणि मी वाचणार नाही असं होईल का..?? वाचत असतो..!!” तेव्हा तो वाचतो ह्याच आनंदात तिची कविता सजली होती..!!
पण मनोमनी खूप वाटत होते, त्यांनी एखादी कविता आवडली हे स्वत: होऊन म्हणावे..!! त्याच्यासाठी तिची कविता आणखीनच समजूतदार झाली. कवितेतल्या ‘तो’च्या ऐवजी कवितेत ‘ती’ स्वत: आली..!! आणि त्या कवितेसाठी त्याचा मेल आला,
“मस्त..!! खूप सुंदर कविता..!! आतापर्यंतची बेस्ट..!!”
त्या दिवशी तिला आकाश ठेंगणे झाले होते, डोळे मिटलेल्या तिच्या चेहऱ्यावर सर्व आठवून आजही हसू उमटलं..!!
आणि आपल्या लिहिण्याचे कारण कुणी दुसर असावं, याचा रागही आला..!! पण त्याच्या न आवडण्यामुळे ती जास्त प्रगत आणि समजूतदार झाली हे मोठ सत्य होत..!!
अन त्या साठी तिला त्याचे आधार मानायचे होते..! प्रेमातला नकार आणि कवितेतला नकार या दोन्ही साठी खूप आधार मानायचे होते, आणि ते कवितेतूनच करू शकते म्हणून तीनी कविता लिहिण्यासाठी पेन आणि डायरी हातात घेतली..!!
No comments:
Post a Comment