Monday, 7 April 2014

प्रेम व्यक्त करताना ९

“आता तुला पुन्हा प्रेमात पडायला जमेल..??”, ब्रेक-अप झालेल्या साराला प्रिया विचारत होती.

“पुन्हा प्रेमात पडण्यासाठी मी कुणाच्या जवळ जाणारच नाही आणि कुणाला जवळ येऊही देणार नाही.”, सारा फार निर्धाराच्या भाषेत बोलत होती.
“सहवासाने माणूस प्रेमात पडतो, सहवास वाढला कि विचारांची देवान-घेवाण होते, विचार पटले-पटवले जातात, एकमेकांची सुख-दु:खे वाटली जातात, आणि कुणाच्याही नकळत प्रेमाचे बीज पेरले जाते. आणि आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय हे कळेपर्यंत बरेच आयुष्याचे निर्णय घ्यायची वेळ होते आणि इथे पुन्हा मने तुटली जातात.”

“किती विचार करायला लागलीस तू..!!” प्रिया तिचे सांत्वन करावे या सुरात म्हणाली.

“हा विचार मी केलेला नाही, फक्त अनुभवाची शिकवण आहे. मुळात प्रेम खरच काय असत हे उलगडे पर्यंत मी त्यात जास्तच गुंतत गेली..!! आणि आज लक्षात आले आहे आपण ज्याला प्रेम म्हणतो, त्याची सुरवात तरी कुठून झाली-अधिक सहवासानेच ना..!!”, आयुष्याचा एक धडा समजल्यागत सारा हे बोलली.
 
“हे पटत आहे..!! पण सहवास आपण टाळू थोडीच  शकतो..??” थोडी गोंधळून प्रिया बोलली.

“का नाही टाळू शकत..?? कुणाशी बोलायचे..?? किती contacts ठेवायचे..?? हे ठरवतो आपणच ना..?? जर हे सर्व ठरवताना आपण आपली अक्कल जाग्यावर ठेवली तर प्रेमात पडण आणि प्रेमातून बाहेर पडण वैगेरे झणझटच राहत नाही..”

“हे सर्व कळत होत तरीही तू...” विचारू कि नाही या स्वरात प्रियानी वाक्य अर्ध सोडलं.

“तरीही तू प्रेमात पडली..!! हेच म्हणायचं का तुला..??,” तीच अर्ध वाक्य पूर्ण करत सारा म्हणली. “मी प्रेमात पडली कारण माझं मन जाणणारा कुणी भेटला होता, माझी निरर्थक बडबड ऐकणारा कुणी भेटला होता. “काय झाल..?” हे आपुलकीनी विचारणारा कुणी भेटला होता. आणि तेव्हा मला कुणाची तरी खरच गरज होती आणि म्हणून कदाचित मी प्रेमात पडली.. या सर्व गोष्टीना प्रेम म्हणनही किती चुकीचे आहे. कारण प्रेमात कारणे नसतात. आणि मी कुणावर प्रेम करणे यात कारणे होती.”

“काही गोष्टी खरच माझ्या पचनी नाही पडत आहे.”, प्रिया म्हणाली.


“प्रेम हा विषयच तसा आहे..!! प्रेमात पडण्यापासून प्रेम व्यक्त करेपर्यंत तो समजत नाही..!! एकदा प्रेम व्यक्त केले कि मग खऱ्या अर्थानी कळतो..” 

No comments:

Post a Comment