Wednesday, 2 April 2014

प्रेम व्यक्त करताना ४



“हे काय आता नवीन..?? तू एकदाच बोल ना बाई तुला काय बोलायचे आहे ते..!! प्रत्येकदा नवीन काही तरी असते.. आणि आज तर एकदम Extreme बोललीस कि Call Ignore कर.. तूच नको ना Call करूस..!! आता म्हणशील मी नाही Ignore करू शकत तूच कर.. काय हे ..?? मला खुपदा वाटायचे तुझ्या Propose नंतरही आपण चांगले Friends आहोत, आणि राहूही पण तू पहिले तुझे माझ्यावर प्रेमच आहे ना..? हे स्वत:ला विचार.. आता काही बोलणार आहेस का? कि नुसती शांत राहून ऐकणार आहेस..!!” तो तिला फार तावातावात बोलत होता..

एका वर्षापूर्वीच “तू मला आवडतोस” हे स्पष्ट ती त्याला बोलली होती,पण त्याला कधी नेहा साठी प्रेमाच्या भावना नव्हत्याच, तसा तो फार तटस्थ आणि समजूतदार होता.कदाचित तो आताही त्याच्या पहिल्याच प्रेमात अडकून होता. तिच्या Feelings ची Respect ठेवून तो तिच्याशी तसाच वागायचा खूप सामंजस्याने.. पण ती काही छोट्या छोट्या अपेक्षा ठेवायची, आणि जिथे अपेक्षा ठेवल्या जातात तिथेच चांगली माणसे दुरावतात..

आजही तेच झाले तीनी भेटायला म्हणून MSG केला होता त्याला,पण काही कारणांमुळे तो नाही भेटू शकला,एक तर अपेक्षा ठेवू नयेत किंवा अपेक्षा भंग झालाच तर तो डोक्यात जाऊ देऊ नये,पण नेहाला दोन्हीही जमले नाही.. तो न भेटता परत गेला होता..

भेटायलाच म्हटले होते मी, काय मोठा पहाड चढायला नव्हते सांगितले. तेही नाही.. मला माहित आहे, नाही आवडत त्याला मी,पण atleast एकदा.. जाऊ दे.. मीच मूर्ख आहे, हा का आवडला मला काय माहिती.. कित्येक विचार मनात थैमान मांडून बसले होते. आणि आधीच प्रचंड खराब गेलेला दिवस असा संपला म्हणून तिला आणखीच स्वत:चा राग आला.

म्हणून रागाच्या भरात तिनी सागर ला MSG केला, “मला एक Favor कर. माझा Call आणि MSG ला कधीही Reply देऊ नकोस.. करशील इतके..??” तिच्या ह्याच SMS वर चिडून तो Call करून तिच्याशी बोलत होता.

आणि ती शांत होती,काय बोलणार ती तरी. तिला सर्व कळत होते आणि वळायला थोडा वेळ लागतोय हे माहितीही होते.

नेहा काहीच बोलत नाहीये म्हणून तो आणखीच चिडला, “खरच बोलायचे नाहीये का आपण आता..?? ठीक आहे तू खूपच Insist करत असशील तर नाही बोलूयात आपण, पण आता जे मी सांगतोय ते पटते का बघ आधी.. हे बघ नेहा मला तर वाटते जे तुला माझ्या बद्दल वाटतय ना ते प्रेम-बीम नाहीये, हनन फक्त तुला माझ्याशी बोलायला आवडतं, मी ऐकून घेतो, तितकंच तुझे मन हलक होत बाकी त्याशिवाय काहीही नाही आहे.. खर प्रेम म्हणजे काय कळते तरी का तुला..??”

“तू शिकव ना रे मग, खरं प्रेम काय असतं.. तू कर ना माझ्यावर खरं प्रेम. प्रेम नसलं तरी करता येतं ना. मी नाही तुझ्याइतकी महान पण मग तू हो ना महान. तू कर ना माझ्यावर प्रेम.”, हेच शब्द आले होते ओठांवर पण भरलेल्या डोळ्यांमुळे म्हणा कि एकाच वेळी दाटलेल्या विचारांमुळे म्हणा ती यातील एकही शब्द बोलू शकली नाही.

 तो मात्र बोलत होता, “आणि प्रेम असं नसत ग, मी भेटायला आलो नाही म्हणून ते कमी होत नसत किंवा आपलं लग्न होणार नाही म्हणून ते थांबत नसत.. कळतंय का तुला..?? प्रेम म्हणजे आपले  Physical Relations असलेच पाहिजे असही काही नाही.. आणि तरीही तुला वाटतच असेल कि तू माझ्या वर प्रेम करते तर तू ते तशेही करू शकते,त्यासाठी मी तुला किंवा तू मला Ignore करायची थोडीही गरज नाहीये.. तुला समजते आहे का मी काय बोलतोय ते..??”

“तुला काय वाटते मला हे माहिती नाही, तू आवडतोस हे सांगितले होते तेव्हाच ह्या गोष्टी CLR केल्या होत्या मी..” हेही बोलायचे राहून गेले.

तो, “काय झालंय..?? बोलणार आहेस का..??”

ती, “मला बोलायचं नाही आहे..!!” रडवेली होऊन.

तो, “रडत आहेस का तू..??”

ती, “नाही.. नाही..”

तो, “शेवटचा Call का मग आपला..??”

ती, “हो”

तो, “ठिक आहे bye..!!”

ती, “Bye..”

एकदा ‘नक्की..’ तरी विचारायचे असते Call ठेवायच्या आधी हा विचार करत ती गालावर ओघळलेले अश्रू पुसत होती..

आणि
“शेवटचा Call म्हणे, खोटेही धड बोलता येत नाही हिला”, हा विचार करून तो झोपी गेला..!!

1 comment: