"मला तू आवडतोस!",हे ब्रम्हांडाची सर्व शक्ती एकवटून एकदाची ती तिच्या मित्र स्वप्नील ला बोलून गेली .
"प्रेमा-बिमा च प्रकरण नाही ना काही?" , तो जरा shocked होऊन विचारतो.
"अरे मुर्खा, तुझ्याशी इतक बोलल्यानंतर, कदाचित तू आता contact हळूहळू कमी करशील हि भीती असतानाही,माझा जगातील सर्वात चांगला मित्र या एका वाक्याने गमवायची भीती असतानाही, मी जेव्हा म्हणते आहे कि तू आवडतोस, म्हणजे कुठेतरी प्रेमाच्या भावना असतीलच, "प्रेमा-बिमा च matter नाही ना काही?" हाही काही प्रश्न झाला?"
"मी तुझ्यावर प्रेम करते" अशे एका मुलीनी बोलून दाखवने कितपत योग्य आहे? म्हणून हा पळपुटा शोधलेला मार्ग "मला तू आवडतोस!" माझ्या-तुझ्या आजूबाजूला जे प्रेम उभा आहे; जो फक्त आकर्षणाचा चा खेळ चाललाय, त्या भीतीने असेल कदाचित हा प्रश्न,पण जे प्रेम girl/boy friend, sex, kiss या सारख्या शब्दांमध्ये बांधल आहे, ते प्रेम मी व्यक्त करत नाही आहे! माझ्या या स्पष्टव्यक्तपणाचा गैरअर्थ काढू नकोस!"
“कुणी आवडण किंवा कुणावर प्रेम करण यात काहीही गैर नाहीय. किंवा माझ्या सारख्याच तुलाही ह्या भावना असल्याच पाहिजे, असही काही नाही..!! कदाचित माझ्या प्रेमाच्या संकल्पना सहसा समजण्या इतक्या सोपी नाहीत..!!"
हा सर्व गोंधळ मनातच मांडून ती म्हणाली,"नाही बहुतेक..!!"
"बहुतेक का? नसायलाच पाहिजे; हे काय आता उगाचच?" ,त्याचा प्रतिसाद.
"उगाचच!! कदाचित तू बरोबर असशील. पण मला काही वेगळेच बोलायचे होते. तुला महीत आहे? आपण आईच्या पोटात असतानाच प्रेमाचे संस्कार आपल्यावर व्हायला लागले असतात. निस्सीम, पवित्र, निखळ अस प्रेम! आई म्हटलं कि मान जशी आदराने झुकते, आपलेपणाने हृदय भरून येते, सर्व दुख: जातात आणि लढायची वेगळीच उब मिळते. तसं निस्वार्थ प्रेम.!" ,स्वत:च्या भावना शब्दात जुळवाजुळव करून सांगत असताना तिला मध्येच थांबवून,
तो म्हणाला, " फारच पुस्तकी बोलते आहेस तू, हे असं प्रेम तिथेच असतं. "
"राधा-कृष्णाचं प्रेम जितकं निस्वार्थ होत. कदाचित ते आता कलयुगात मी अपेक्षित कारण तितकस योग्य नाही, कारण राधेसाहित कृष्णाचा स्वीकार करणारी रुक्मिनीही मला बनता येणार नाही! कशाला उगाच तुही बरबाद अन मीही बरबाद! प्रेम व्यक्त करण सोपं आणि योग्य नाही." ,असा काहीसा विचित्र विचार स्वत:च करून ती म्हणाली, " असो, प्रेमावर बोलण्या इतपत मी मोठी नाही, आणि नाही रे प्रेम-बिम च प्रकरण नाही काही;एक मित्र म्हणून आवडतोस, झकास आहेस. तसाच रहा.! "
"खोटंही धड बोलत येत नाही हिला", असा विचार करून तोही मिस्किल हसला..!!

No comments:
Post a Comment