Monday, 7 April 2014

प्रेम व्यक्त करताना ६



“विसरू शकेल ना रे मी त्याला..?,” एकदम चिंतातूर होऊन प्रिया आपला मित्र सुभाषला विचारत होती..

“इथे आली तेव्हा ठरवले होते कि,प्रेम-बीम भानगडीत पडायचे नाही.. जे ध्येय उराशी बाळगून आलोय ते पूर्ण करून परत जायचे.. ध्येय तर पूर्ण झालंय, पोट भरेल इतके शिक्षण तरी पदरी पडलय पण सोबत हा प्रेमाचा अनुभव खूप जिव्हारी लागतोय..

“मी फार महान वैगेरे नाही,मलाही साध्यासुध्या मुलीसारखे होणाऱ्या जोडीदाराची स्वप्ने पहायची आहेत,त्याच्या विचारांनी वाढलेले हृदयाचे ठोके अनुभवायचे आहेत. पण खरच मी पुन्हा प्रेमात पडू शकेल का रे..?? वाढलेले हृदयाचे ठोके पुन्हा जाणवतील ही जाणीवच संपले ना अंतरी..!! आणि चुकून-मुकून संसारात बांधलीही गेली तर तो संसार टिकवण्यासाठी लागणार बळ असेल ना रे माझ्यात..? तू तर मला, माझ्या पेक्षा जास्त ओळखतोस ना..? मग आहेत या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे..?

“मी चुकली कुठे..?? माझा गुन्हा काय ते तरी सांग..? मी प्रेमात पडली हेच ना..?? प्रेमात पडली का धक्का देऊन पाडली गेली..? कुणावर प्रेम केल्यानी इतका त्रास होतो का रे..?? बोल ना.?? प्रेमाच कळत नाही आहे पण तुझ्या शांततेचा नक्कीच त्रास होतो..”, संताप, द्वेष,चीड तिच्या मनात कल्लोळ करत होता..

“ हे बघ, तुला अजय बद्दल feelings आहेत न, हे काहीही चूक नाही,पण त्यालाही तुझ्याबद्दल feelings असायलाच हव्यात ही तुझी अपेक्षा चुकीची आहे.. प्रेमात कधीही अपेक्षा असू नये नाही का..? खर तर हे मी तुलाच सांगणे किती चूक आहे.. तू खूप कठोर आहेस ना..? आणि माझा विश्वास आहे तू लवकरच बाहेर निघशील त्याच्या विचारातून..!!

“आणि आता मी हीच अशी अपेक्षा का ठेवली,म्हणून स्वत:ला कोसाण्यापेक्षा, Move on, dear..!!”
सुभाष असे बोलतना आपण किती भाग्यवान आहोत असा इतकासा समंजस मित्र मिळाला हा विचार ती करत होती.

“ तो अजय आला, डोळे पूस आधी..”, ही तिची तंद्री तोडत सुभाष बोलला.

येता येताच अजय, “माझ्या विरुध्द कट-बिट रचत होतास का तुम्ही दोघे..?, मी आल्यावर एकदम दोघेही शांत झालात.”

“नाही, हा तुझा मित्र तुझ्या विरुद्ध एक शब्द ऐकू शकत नाही! कट कसला रचतोय..!! चला, माझी जायची वेळ झाली. हॉस्टेल चा इन टाइम आणि तुझा इन टाइम नेहमी सारखाच असतो..”, तिच्या बोलण्यात तक्रार नव्हती पण नाराजी स्पष्ट समजत होती.

तिला आणखीनच चिडवण्यासाठी तो म्हणाला, “ मुद्दामच उशीर करतो मी, तुझ्याशी बोलायचे नसते ना मला..!!”

भावशून्य चेहरा करून, “ हो माहिती आहे ते..!!”

“मी यायच्या आधी काही matter झालय का तू रडल्यासारखी दिसतेस..??”

“नाही, काहीच नाही, chal bye, भेटू पुन्हा..”

“भेटूच का..??”

तिनी फक्त वळून एक कटाक्ष टाकला..


तोच म्हणाला “चल भेटूच, bye..” आणि सुभाष ला हळूच म्हणाला, “मला विसरायचं आहे म्हणाली असेल, विसरू शकेल कि नाही हाच प्रश्न पडला असेल.. मला विसराव लागतंय म्हणून रडली ना रे ही..? अजून खोटही धड बोलता येत नाही हिला..!!” 

1 comment:

  1. aai shapath..... khup divasanantar kaitari feel kelyach janavlay..... gd going.....

    ReplyDelete